कार अपघातात बचावलेला टायगर वूडची प्रकृती सुधारतेय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचा विख्यात गोल्फपटू टायगर वुड्स याच्या दोन्ही पायांना लॉस एंजेलिस येथे झालेल्या कार अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. मात्र शस्त्रक्रियेनंतर वुड्सच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. रांचो पालोस वेर्डेसजवळ वुड्सच्या कारचे नियंत्रण सुटल्यानंतर दुभाजकाला आदळून ही कार गटांगळ्या खात शेकडो फूट खोल टेकडीखाली कोसळली. वुड्सचा उजवा पाय आणि घोटय़ावर शस्त्र्ाक्रिया करण्यात आली. ‘वुड्स शुद्धीत आला असून तो उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहे.