
ऑनलाईन शाळा सुरू असल्याने आता प्रत्येक मुलांच्या हातात स्मार्टफोन आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात मुलांना टीव्हीऐवजी युटय़ूबवर व्हिडीओ पाहण्याची जास्त सवय लागलीय. तासन्तास स्मार्टफोन हातात घेऊन आपली मुलं युटय़ूबवर नेमकं काय पाहतायत हे पालकांना कळत नाही. पालकांची ही अडचण लक्षात घेऊन युटय़ूबने खास फिचरची घोषणा केली आहे. या फीचरमुळे युटय़ूबवर आता पालकांची सेन्सॉरशीप असणार आहे. आपली मुलांनी युटय़ूबवर कोणते व्हिडीओ पहावे याचे कंट्रोल आता पालकांच्या हाती असणार आहे. सुपरर्वाईज्ड गुगल अकाऊंटच्या माध्यमातून आपल्या मुलांच्या युटय़ूब अकाऊंटवर पालकांना वॉच ठेवता येणार आहे.
n एक्सप्लोर ही सेटिंग 9 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहे. या सेटिंगच्या व्हिडीओमध्ये क्लॉग्स, टय़ुटोरियल्स, गेमिंग व्हिडीओज, म्युजिक क्लीप आणि न्यूजचा समावेश असेल. n एक्सप्लोर मोर ही सेटिंग 13 वर्षांहून अधिक वयोगटातील मुलांसाठी आहे. n मोस्ट ऑफ युटय़ूब सेटिंगमध्ये एज रेस्ट्रीक्शन असलेले व्हिडीओ वगळता मुले जवळपास सर्वच व्हिडीओ पाहू शकतील.




























































