
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. यात भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुलगी ही परक्याचं धन असतं असे ट्विट सुप्रियो यांनी केले होते. या ट्विटवरून वाद झाल्यानंतर सुप्रियो यांनी ट्विट डीलीट केले.
सुप्रियो यांनी एक मीम ट्विट केला होता. त्यात ममता बॅनर्जी यांचा फोटो होता आणि म्हटले होते की मी बंगालची मुलगी आहे. त्याखाली अमित शहांचा फोटो होता आणि म्हटले होते की, मुलगी हे परक्याचं धन असतं आता या मुलीची पाठवणी करू.
या ट्विटवरून चांगलाच वाद झाला. अखेर सुप्रियो यांनी ट्विट डीलीट केले, असे असले तरी तृणमूल काँग्रेसने भाजपला धारेवर धरले असून भाजपच्या पुरुषप्रधान मानसिकेतवर टीका केली आहे.
.@SuPriyoBabul ji, I am extremely worried about the state of women’s affairs in this country if public representatives like you endorse such chauvinist views.
STUNNED and SHOCKED to see how deep and wide sexism runs in @BJP4India leaders!! #BanglaNijerMeyekeiChay pic.twitter.com/XWoUdRenOw
— Dr. Shashi Panja (@DrShashiPanja) February 27, 2021

























































