
पुणे विभागातील 5 लाख 89 हजार 510 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून विभागात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 18 हजार 655 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 804 इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 341 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.29 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 4 लाख 8 हजार 53 रुग्णांपैकी 3 लाख 88 हजार 610 रुग्ण बरे होत घरी परतले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 295 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 148 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.24 टक्के आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 58 हजार 723 रुग्णांपैकी 55 हजार 717 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 156 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 850 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 52 हजार 950 रुग्णांपैकी 50 हजार 216 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 893 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 841 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 48 हजार 492 रुग्णांपैकी 46 हजार 567 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 167 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 758 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 50 हजार 437 रुग्णांपैकी 48 हजार 400 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 293 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 884 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 600, सातारा जिल्ह्यात 119, सोलापूर जिल्ह्यात 104, सांगली जिल्ह्यात 17 तर कोल्हापूर जिल्ह्यात 44 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झाली आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या 1 हजार 214 आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 1 हजार 83 , सातारा जिल्हयामध्ये 18, सोलापूर जिल्ह्यामध्ये 101, सांगली जिल्ह्यामध्ये 7 व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यत विभागामध्ये एकूण 40 लाख 65 हजार 153 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 18 हजार 655 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.






























































