हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनी शोधले 18 लघुग्रह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील शाळकरी विद्यार्थ्यांनी नासाच्या सिटिजन सायन्स  परियोजनेट सहभागी होत अंतराळातील 18 नवे लघुग्रह (उल्कापिंड) शोधण्याचा पराक्रम केला आहे. इंटरनॅशनल  एस्ट्रोनॉमिकल सर्च कोलेबरेशन (आइएएससी) च्या सहकार्याने स्टेम आणि स्पेस नामक संघटनेने अंतराळातील लघुग्रह  शोधण्याची आणि त्यांना नवे सुचविण्याची आंतरराष्ट्रीय मोहीम आखली होती. त्यात हिंदुस्थानच्या 150 शाळकरी विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

ही मोहीम सुमारे दोन महिने चालवण्यात आली.अंतराळात फिरणारे लघुग्रह  पृथ्वीवर आदळून मोठी हानी होण्याचा धोका संभवतो.त्यामुळे हे ग्रह शोधून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याची योजना अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) आखली आहे. त्याचाच भाग म्हणून ही मोहीम राबवण्यात आली. त्यात सहभागी हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तापूर्ण शोधाचे नासाने कौतुक केले आहे.