
आर्थिक संकटातून जाणाऱया ‘बेस्ट’ला मदत करताना पालिकेने 405.73 कोटींचे ‘कर्ज नव्हे तर अनुदान द्यावे’ अशा ठरावाला पालिकेच्या महासभेने आज मंजुरी दिली. यामुळे ‘बेस्ट’च्या सेवानिवृत्त कामगारांची थकीत देणी मिळणार आहेत. ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी ही माहिती दिली.
मुंबईकरांना वाहतूक आणि ऊर्जेची सेवा देणाऱया ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून ‘बेस्ट’ला मदत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोविड काळात ‘बेस्ट’ने आपली सेवा अविरतपणे पुरवली. आपल्या 3500 बससह एसटीच्या एक हजार गाडय़ा घेऊन मुंबईकरांना परिकहन सेका देण्यात आली. यासाठी पालिकेने ‘बेस्ट’ला 33.80 कोटींचे अनुदान दिले. शिकाय अर्थसंकल्पात 60 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत ‘बेस्ट’ला आतापर्यंत तीन हजार कोटींहून जास्त मदत करण्यात आली आहे. या कर्षी अर्थसंकल्पातून आणखी 750 कोटींचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.
‘बेस्ट’मध्ये सेवा बजावताना कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या 100 कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांना प्रत्येक 50 लाख अर्थसहाय्य करण्यासाठी 50 कोटींचे अनुदानही देण्यात आले आहे. दरम्यान, सेवानिवृत्त 3649 कर्मचाऱयांना ग्रॅच्युइटी रक्कम, थकीत देणी देता याकी यासाठी 4 टक्के व्याजदरावर 405.73 कोटी रुपये देणार असल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्प सादर करतानाच स्पष्ट केले होते. मात्र कर्ज नको तर अनुदान द्यावे अशी मागणी ‘बेस्ट’ समितीने केली होती. यानुसार मांडलेल्या ठरावाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी अनुदान देण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे जाहीर केले.
‘बेस्ट’मध्ये झाला होता निर्णय
विविध वित्त संस्थांकडून घेतलेले कर्ज तसेच खासगी कंपन्यांची ‘बेस्ट’ला तब्बल 2 हजार 483 कोटी रुपयांची देणी द्यायची आहेत. त्यामुळे पालिकेनेही ‘बेस्ट’ला कर्जाच्या स्वरूपात पैसे दिल्यास कर्जाचा बोजा काढणार आहे. त्यामुळे कर्ज न देता अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत 25 फेब्रुवारी रोजी ‘बेस्ट’ समितीच्या बैठकीत याबाबत ‘कर्ज देण्याऐवजी अनुदान द्यावे’ असा ठराव मंजूर करण्यात आला होता. ‘बेस्ट’ समितीच्या ठरावाला आता महासभेचीही मंजुरी मिळाली आहे. प्रशासनाच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी होणार आहे. या अनुदानामुळे ‘बेस्ट’च्या कर्मचाऱयांची देणी मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.



























































