राहण्यायोग्य उत्तम शहरात सोलापुरला स्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या शहरी आवास व कार्यासन मंत्रालयाच्या वतीने करण्यात आलेल्या राहण्यायोग्य उत्तम शहरांच्या सर्वेक्षणात सोलापूर स्मार्ट सिटी महाराष्ट्रात चौथे, तर देशात सतरावे मानांकन प्राप्त झाले आहे. देशभरातील एकूण 114 शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता. त्याआधारे ही निवड करण्यात आली आहे. यामुळे सोलापूर शहराचे नाव संपूर्ण देशात उंचावले आहे.

शहरातील व्यवसाय, शैक्षणिक व्यवस्था, आरोय सुविधा, राहण्यासाठी परवडणारी घरे, स्वच्छता, पिण्याचे पाणी, सुरक्षितता, दळणवळणाची साधने, अग्निशामक दल, रुग्णवाहिकांची उपलब्धता, सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षितता, खेळाची मैदाने, मनोरंजनासाठी चित्रपटगृहे, रोजगाराच्या संधी, बँक सेवा, इन्शुरन्स, एटीएम, क्रेडिट कार्ड यासारख्या सुविधांचा सर्वेक्षण करताना विचार करण्यात आला होता.

सोलापूर शहरातील 28 शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम बनविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. 225 घंटागाडय़ा आणि 4 ट्रान्सफर स्टेशनद्वारे घनकचऱयाचे योग्य व्यवस्थापन केले जात आहे. घरोघरी कचऱयाचे वर्गीकरण करण्यासाठी दीड लाख डस्टबिन वाटप करण्यात आले आहेत. उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम प्रगतिपथावर आहे. स्मार्ट सिटी भागातील जलवाहिन्या बदलण्यात

सोलापूर शहराची गणना राहण्यायोग्य शहरांच्या यादीत वरच्या क्रमांकावर होत आहे, याचा विशेष आनंद वाटला. याचे सारे श्रेय महापौर, महापालिका आयुक्त, नगरसेवक, अधिकारी, स्मार्ट सिटी कार्यालय, शहरातील नागरिक यांना दिले पाहिजे. यापुढील काळात सोलापूर स्मार्ट सिटी पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न केले जातील.

– त्र्यंबक ढेंगळे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी.आल्या असून, नळाला स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. नागरिकांना 24 तास पाणी देण्याचे नियोजन केले आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा स्काडा प्रणालीद्वारे नियंत्रित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.