मलाला युसूफझई कार्टून फिल्म बनवणार; ऍपल कंपनीच्या सहकार्याने करणार काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोबेल पुरस्कार विजेती, सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझई हिने कार्टून फिल्म आणि डॉक्युमेंट्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तिने ऍपल कंपनीसोबत भागीदारी करायचे ठरविले आहे.

23 वर्षांच्या मलालाने गेल्या वर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ऍपल कंपनीसोबत लहान मुलांसाठी ड्रामा, डॉक्युमेंट्री, ऍनिमेशन, कॉमेडी आणि सीरिज बनवण्यासाठी काही वर्षांसाठी करार केल्याची माहिती तिने सोमवारी दिली. लहानपणी आपल्याला कार्टून फार आवडायचे.

कार्टून बघण्यामुळे मुले आजूबाजूला असलेल्या भीषण वास्तवापासून स्वतःचा बचाव करू शकतात असे मलालाला सांगितले. कार्टून फक्त हसवतं आणि मुलांचे मनोरंजन करतं. म्हणून आपण डॉक्युमेंट्री शोज करू इच्छित असल्याचेही तिने सांगितले. मला भेटणाऱया मुलींना मी या प्रवासात सहभागी करून घेईन, असेही ती म्हणाली. मलाला युसूफझई हिने 2014 मध्ये शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळवला होता. हा पुरस्कार जिंकणारी ती सर्वात कमी वयाची व्यक्ती ठरली आहे. बाल हक्कांसाठी मलाला गेली काही वर्षे प्रयत्नशील आहे.