
पाकिस्तानने टिकटॉकवर पुन्हा बंदी घालून निकटचा मित्र असलेल्या चीनला मोठा झटका दिला आहे. टिकटॉकच्या व्हिडीओतून अश्लिल व आक्षेपार्ह कंटेट पसरवला जात आहे, असा दावा दोन वकिलांनी पेशावरच्या उच्च न्यायालयापुढे केला. त्यावर न्यायालयाने टिकटॉकवर बंदी घालण्याचा आदेश टेलिकॉम प्रशासनाला दिला.
चीन हा पाकिस्तानचा जवळचा मित्र मानला जातो. हिंदुस्थानविरोधात कुरापती करण्यासाठी हे दोन देश हातात हात घालतात. पाकिस्तानने सहा महिन्यांपूर्वीही टिकटॉकवर बंदी घातली होती. त्यानंतर आता न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून टिकटॉक ऍप ब्लॉक करण्यात आले आहे.
लवकरात लवकर टिकटॉकचा ऍक्सेस ब्लॉक करण्याचे निर्देश सेवा पुरवठादारांना देण्यात आले आहेत. पाकिस्तानात टिकटॉकचे जवळपास 3 कोटी 30 लाख युजर्स आहेत.




























































