
किशिनचंद चेलाराम महाविद्यालय (एच्एस्एनसी विद्यापीठ), मुंबई यांनी 17 ते 19 मार्च, 2021 या कालावधीत आठवी आंतरराष्ट्रीय माध्यम परिषद आयोजित केली आहे. जन माध्यम विभाग या वार्षिक परिषदेचे गेलं सात वर्षे आयोजन करीत आहे. ही परिषद यंदा व्हर्च्युअल माध्यमातून संपन्न होत असून ‘2021 मधील डिजीटल माध्यम साक्षरता’ हा परिषदेचा मुख्य विषय आहे. Saamana.com या माध्यम परिषदेचे डिजीटल पार्टनर आहे. या परिषदेसंदर्भातील वृत्त वाचण्यासाठी Saamana.com वर भेट द्या. तसेच सामनाचे फेसबुक पेज आणि ट्वीटर हँडल (saamanaonline) ला लाइक आणि फॉलो करा. या परिषदेला जगभरातून अतिशय चांगला प्रतिसाद आला असून, यूके, यूएस, चीन, मॉरिशीअस आणि अन्य देशांतून अनेक संशोधक, शिक्षणतज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे देशातील नामांकित विद्यापीठांतून देखील अनेकांनी या परिषदेत सहभाग घेतला आहे.
परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून एच्एस्एनसी विद्यापीठाचे विश्वस्त आणि मुंबईतील प्रख्यात वकील श्री. अनिल हरीश उपस्थित राहणार आहेत. परिषदेची महत्वाची उद्दिष्टे भारतीय जनसंज्ञापन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय द्विवेदी सादर करतील. तसेच बोर्नमाउथ विद्यापीठाच्या प्राध्यापिका आणि माहितीपट दिग्दर्शक डॉ. सु सडबरी ‘लोकेटिंग अ थर्ड व्हॉइस : पार्टीसिपेटरी फिल्ममेकिंग अँड डिजीटल स्टोरी टेलिंग इन रुरल इंडिया’ या विषयावर 19 मार्च, 2021 रोजी बोलणार आहेत.
कट्सटाऊन विद्यापीठ, पेनसिल्व्हेनिया, शामियाना फिल्मस्, मुंबई यांच्या सहयोगाने किशिनचांद चेलाराम महाविद्यालाने 16 मार्च, 2021 रोजी टॉकिंग फ्रेम्स या चित्रपट महोत्सवाचे परिषदेचा एक भाग म्हणून आयोजन केले आहे. या महोत्सवातील चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक आणि संकलक विविध महाविद्यालयातील चित्रपट, दूरदर्शन आणि नवमाध्यम उत्पादन याचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत.
17 मार्च 2021 रोजी पूर्व-परिषद सत्रे होणार आहेत. या सत्रांचे वक्ते डॉ. जीडी जयालक्ष्मी ( असोशिएट डीन, लर्निंग अँड टीचिंग स्कूल ऑफ फिल्म अँड टेलीव्हिजन आर्ट्स झियान जाओटॉंग लिव्हरपूल युनिव्हर्सिटी), डॉ. मायकेल जॉनस्टन (असोसिएट प्रोफेसर अँड चेअर डिपार्टमेंट ऑफ सिनेमा, टेलीव्हिजन अँड मीडिया प्रोडक्शन, कट्सटाऊन युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया, यूएसए ) आणि डॉ. उर्सुला पृशन्युस्का ( असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडिज कट्सटाऊन युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया, यूएसए) असणार आहेत.
केसी महाविद्यालयाच्या प्राचार्या, डॉ. हेमलता बागला म्हणाल्या, “ही परिषद निरनिराळ्या उद्योगांमध्ये होणारे डिजीटल बदल आणि त्यांचे परिणाम याबाबत संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, व्यावसायिक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शक ठरेल.”
जन माध्यम विभागाच्या प्रमुख तसेच या परिषदेच्या संयोजिका डॉ. मंजुला श्रीनिवास म्हणतात, “या परिषदेद्वारे, नवमाध्यमांत निर्माण होत असलेल्या संधी याची जगाला ओळख होईल, तसेच डिजीटल माध्यम साक्षरता या विषयात उच्च शिक्षणासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल”.
शिक्षण आणि मीडिया या परिषदेचा गाभा आहेत तसेच तांत्रिक प्रगतीमुळे त्यांच्यात झालेला बदल ह्यावर विचार – विनिमय व चर्चासत्र अनुभवायला मिळेल.
केसी महाविद्यालय आणि जन माध्यम विभागाबद्दल थोडक्यात :
केसी महाविद्यालयाची स्थापना 1954 साली झाली. एच. एस. एन. सी. म्हणजेच हैदराबाद (सिंध) नॅशनल कोलिजियट बोर्डाच्या छत्रछायेखाली या महाविद्यालयाची स्थापना झाली. जानेवारी 2015 रोजी ‘ सर्वोत्तम महाविद्यालय ‘ हा पुरस्कार केसी महाविद्यालयाला मिळाला. नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धतीने विद्यार्थांना शिकवणं हा महाविद्यालयाचा मुख्य हेतू आहे. इंडिया टुडे या मासिकतून भारतातील पहिल्या सर्वोत्तम 10 जनसंज्ञापन महाविद्यालयांमध्ये, जन माध्यम विभाग, केसी महाविद्यालयाची नोंद गेल्या दशकात 7 वेळा करण्यात आली आहे. 2019 मध्ये जन माध्यम विभागाची सर्वोत्कृष्ट 10 माध्यम महाविद्यालय यामध्ये द विक मासिकाने नोंद केली आहे. तसेच २०२० मध्ये भारतातील उदयोन्मुख माध्यम महाविद्यालय म्हणून विभागाची नोंद इंडिया टुडे मासिकातर्फे करण्यात आली आहे. नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धतीने विद्यार्थांना शिकवणं हा मुख्य हेतू लक्षात घेऊन जन माध्यम विभागात बी.ए.एम.एम.सी. (BAMMC), बी.ए.एफ.टी.एन.एम.पी. (BAFTNMP), एम.ए.सी.जे. (MACJ), आणि एम.ए.ई.एम.ए. (MAEMA) आदि अभ्यासक्रम शिकविले जातात. मीडिया क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्ती या शिक्षणसंस्थेचा भाग झाल्या आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
मास मिडिया विभाग, के.सी. महाविद्यालय,
[email protected]
022-22826122




























































