पायाच्या दुखण्यासाठी दवाखान्यात गेली आणि रिपोर्ट पाहून हादरलीच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वारंवार पाय दुखत असल्याने दवाखान्यात गेलेल्या महिलेला भयानक वास्तवाला सामोरे जावे लागले. या महिलेची डॉक्टरांनी तपासणी तपासणी करुन एक्स-रे, स्कॅन केले असता रिपोर्ट पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.चीनमधील झेजियांग प्रांतातील पंचवीस वर्षीय महिलेचे नाव पिंगपिंग असे आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. पाय दुखत असल्याने ती झेजियांग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये उपचारासाठी गेली होती.

उपचारापूर्वी पिंगपिंगचे एक्स-रे, स्कॅनिंग करण्यात आले. याचे रिपोर्ट पाहिल्यावर डॉक्टरांनाही धक्का बसला. ती महिला ही महिला नसून एक पुरुष असल्याचे त्या रिपोर्टमधून लक्षात आले. या महिलेच्या शरिरात गर्भाशय, अंडाशय नव्हते. मात्र, स्त्रियांची गुप्तांगे तिच्या शरीरात होती.  तिच्यामध्ये महिलांकडे असलेली एक्स गुणसूत्रे नसून वाय गुणसूत्रं आहेत. त्यामुळे ही शारीरीकदृ्ट्या महिला असली तरी वैद्यकीयदृष्ट्या एक पुरुष असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

पिंगपिंगचे लग्न होऊन बरीच वर्ष झाली आहे. इतर महिलांप्रमाणे तिचीही आई होण्याची इच्छा आहे. मात्र ती गरोदर राहत नव्हती. आई होण्यासाठी ती प्रयत्न करत होती. डॉक्टरांनी पूर्ण तपासणी केल्यानंतर पिंगपिंग ही स्त्री नसून पुरुष असल्याचे सांगितले. त्यांनी ही बाब सांगितल्याने तिच्या घरच्यांना धक्का बसला आहे. पिंगपिगचे आईवडील हे लग्नापूर्वी नातेवाईक होते. पिंगपिंगच्या शरीरातील ही गुंतागुंत  तिच्या पालकांनी विवाह नात्यात केल्याने झाली असावी असा डॉक्टरांनी अंदाज व्यक्त केला आहे.