मोदींचे तोंडही पाहायचे नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता रंगात येऊ लागली असून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत.

तृणमूलच्या अध्यक्षा-मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या व्हीलचेअरवरूनच प्रचारात उतरल्या आहेत. पूर्व मदिनापूर येथील प्रचार सभेत बोलताना ममता म्हणाल्या, ‘भाजपला निरोप द्या. आम्हाला भाजप नकोय. आम्हाला मोदींचं तोंडही पाहायचं नाही. आम्हाला दंगल, चोर, दुर्योधन, दुःशासन, मीर जाफर नकोय,’ असे म्हणत ममतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

‘त्या’ खांबाचे म्हणणे काय?

नंदिग्रामधील एका खांबाकडे ममता बॅनर्जी जखमी कशा झाल्या याची विचारणा फॉरेन्सिक टीमने केली आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीतील फॉरेन्सिक टीमने त्या खांबाचे निरीक्षण केले आणि त्यावर तपासणीचा स्टिकरही डकवला. याच खांबाला धडपून ममता जखमी झाल्याचे काहींचे म्हणणे आहे.