पोपटाची थक्क करणारी कारागिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावरील प्राणी-पक्ष्यांचे मजेशीर व्हिडीओ नेटिजन्सला खूप आवडतात. त्यातील कल्पकतेला दाद द्यावी तितकी कमी असते. त्यामुळेच अवघ्या काही तासांतच हे व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात व्हायरल होतात.

सध्या पोपटाची कारागिरी दाखवणारा असाच एक व्हिडीओ लोकांच्या पसंतीस पडत आहे. तो बघून असं वाटतंय की सर्जनशीलतेमध्ये पक्षी कुठेही माणसापेक्षा कमी नाहीत.

व्हिडीओमधील पोपट कॅलेंडरची पान एखाद्या मशीनप्रमाणे कापून त्यातून सुंदर नक्षी तयार करत आहे. असं वाटतंय जणू काही तो खास नक्षीकाम करतोय.

त्याची एकाग्रता आणि क्रिएटिव्हिटीची बघून भले भले थक्क झाले आहेत. हा मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर वाइल्ड लाइफ 0.2 या पेजवरून शेअर झाला आहे. काही तासांतच तो व्हायरल झाला असून अनेक लोक त्याला लाइक्स आणि कमेंट करत आहेत.