
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील श्री महावीर जैन हॉस्पिटलने ठाणे महानगर पालिकेच्या सहकार्याने मंगळवारी 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना तसेच विशेष को-मोर्बिडीटीजने पीडित 45 ते 59 वर्षे वयोगटातील व्यक्तींना चोवीस तास मोफत लसीकरण देण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून हॉस्पिटलला विषाणूमुळे प्रतिकूल परिणाम झालेल्या सामान्य व्यक्तीचे जीवन सुलभ होण्याची आशा आहे. नागरिक या हॉस्पिटलमध्ये लसीकरणासाठी थेट जाऊ शकतात किंवा आरोग्य सेतू व कोविन अॅपच्या माध्यमातून नोंदणी करू शकतात.
























































