प्रकृती अस्वास्थ्य, राष्ट्रपती कोविंद रुग्णालयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ramnath-kovind

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती आज अचानक खालावली. छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीतील आर्मी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन जारी करून राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

कोविंद यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांची तात्काळ तपासणी करण्यात आली. ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून चिंतेची बाब नसल्याचे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले.