कोविड लस घेतल्यानंतरही परेश रावल यांना कोरोनाची लागण, ट्विटरवरून दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
paresh rawal

अभिनेते आणि माजी खासदार परेश रावल यांना कोरोनाची लागण झाली आहे. रावल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
परेश रावल यांनी ट्विट करून म्हटले आहे की दुर्दैवाने मला कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 10 दिवसांत जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोरोना चाचणीए करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.


परेश रावल 65 वर्षाचे असून 9 मार्च रोजी त्यांनीए कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी एक फोटोही त्यांनी ट्विट केला होता.

गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात रणबीर कपूर, मनोजज वाजपेयी, आमिर खान आर माधवन, कार्तिक आर्यन यांचा समावेश आहे.