विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी; पदव्युत्तर अभ्यासक्रम परीक्षा 25 मे पासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाकडून पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून यंदा प्रथमच सर्व महाविद्यालयांना ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी पहिल्यांदाच प्रश्नपेढी पुरवली जाणार आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित तसेच संचलित सर्व महाविद्यालयांतील पारंपरिक (कला, वाणिज्य व विज्ञान) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सत्र-1 व सत्र-1 या  (बॅकलॉग) परीक्षा 25 मे  ते 5 जून, या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. तर पारंपरिक (कला, वाणिज्य व विज्ञान) पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सत्र-2 व सत्र-4 ( नियमित व बॅकलॉग) परीक्षांसाठी परीक्षा विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्याकडून स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.