
कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या पाहता दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी विद्यार्थी, पालकांनी दादरच्या शिवाजी पार्क येथे आंदोलन केले. वर्षभर ऑनलाइन अभ्यास केला असताना आता ऑफलाइन परीक्षा कशा देणार, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
ऑनलाइन परीक्षेच्या मागणीसाठी राज्यातील विविध जिह्यांमध्ये दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन करण्यात आले होते. दोन परीक्षांमध्ये पुरेसे अंतर राखा, दहावीप्रमाणेच बारावीलाही बेस्ट ऑफ 5 हा पर्याय द्या, अकरावीपर्यंत सरसकट पास करा, कोणतेही दोन विषय ऑप्शनला टाकण्याची परवानगी द्या, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. दरम्यान आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांना हुसकावून लावताना पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली.




























































