
पुण्यात डांबर प्लँटमध्ये दोन्ही ट्रकमध्ये सापडून चालक ठार झाला आहे. लोहगावमधील खांदवेनगरमध्ये रामेश्वर भानुदास केंद्रे असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संग्राम केंद्रे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
12 मार्च रोजी डांबर प्लँटमध्ये मटेरियल भरण्यासाठी रामेश्वर ट्रक घेउन गेला होता. त्याच्या मदतीला क्लिनर नव्हता. त्यावेळी बालाजी केंद्रे हा दुसरा टिप्पर ट्रक चालक गाडी मागे घेत होता. त्यावेळी रामेश्वर त्याला साईड सांगण्यासाठी मदत करीत होता. ट्रक मागे सुटल्यामुळे रामेश्वर दोन्ही ट्रकमध्ये सापडून गंभीररित्या जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान काल त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. लहाने तपास करीत आहेत.



























































