मुंबई महानगरपालिकेच्या वैधानिक समित्यांची निवडणूक उद्या 5 एप्रिलपासून होत असून यामध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय आणि भाजपचे पानिपत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेत97 नगरसेवकांसह सर्कात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला विरोधी पक्षातील राष्ट्रवादी, ‘सपा’ने पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेचा विजय निश्चित आहे. तर भाजपचा पुन्हा एकदा दारुण पराभव होणार आहे.
पालिकेच्या वैधानिक समित्यांच्या एप्रिलमध्ये होणाऱया निवडणुकीत 2017 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपनेही आपले उमेदकार उभे करून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला. याकेळी विरोधकांनीही शिवसेनेलाच साथ दिल्याने भाजप तोंडावर आपटली होती. या वर्षी काँग्रेस वगळता राष्ट्रवादी आणि ‘सपा’ने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचा चारही वैधानिक समित्यांवर विजय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण समितीची निवडणूक 5 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता तर स्थायी समितीची निवडणूक 2 काजता होणार आहे. तर 6 एप्रिल रोजी सुधार समितीची निवडणूक दुपारी 12 काजता आणि ‘बेस्ट’ समितीची निवडणूक दुपारी 3 काजता होणार आहे.
काँग्रेस उमेदवारी मागे घेणार नाही
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणुकीआधी उमेदवारी मागे घेत शिवसेनेला साथ दिली होती. मात्र यावेळी आम्ही चारही जागा लढवणार असल्याचे विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे रवी राजा यांनी सांगितले.
शिवसेनेचे शिलेदार
शिवसेनेकडून स्थायी समिती अध्यक्षपदासाठी यशवंत जाधव यांनी सलग चौथ्या वेळी अर्ज दाखल केला आहे. तर शिक्षण समितीसाठी संध्या दोशी यांनी दुसऱयांदा, सुधार समितीसाठी सदानंद परब यांनी तिसऱयांदा आणि ‘बेस्ट’ समितीसाठी आशीष चेंबूरकर यांनी पाचव्यांदा अर्ज दाखल केला आहे.
असे आहे संख्याबळ
पक्ष स्थायी शिक्षण सुधार बेस्ट
शिवसेना 11 9+2 11 7
भाजप 10 8+1 10 6
काँग्रेस 3 3+1 3 2
राष्ट्रवादी 1 1 1 1
सपा 1 1 1 –






























































