युवासेनेमुळे पालकांना दिलासा; प्रभादेवीच्या गर्ल्स कॉन्व्हेंट हायस्कूलची फी दोन हप्त्यांत भरता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

युवासेनेमुळे प्रभादेवीच्या गर्ल्स कॉन्व्हेंट हायस्कूलच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. शाळा प्रशासनाने पालकांना दोन हप्त्यात फी भरण्याची सूट दिली आहे. याआधी शाळा प्रशासनाकडून पालकांना एकरकमी फी भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पूर्ण फी न भरल्यास पाल्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल, असे पालकांना सांगण्यात आले होते. या प्रकरणी पालकांनी युवासेनेकडे तक्रार केली होती.

शाळेने पालकांसाठी परिपत्रक जारी केले असून पालक दोन हप्त्यात फी भरू शकतात. तसेच शक्य असल्यास सर्व फी एकत्रित भरू शकतात, असे शाळेने म्हटले आहे. शाळेच्या पालकांकडून राज्याचे मंत्री, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे शाळेविरोधात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनुसार युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत व राजन कोळंबेकर यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे लेखी तक्रार करून पाठपुरावा केल्यानंतर सदर शाळेने दोन हप्त्यांत फी भरण्याचे लेखी आदेश काढून पालकांना दिलासा दिला आहे.