
भारतीय आयुर्विमा महामंडळातील (एल.आय.सी.) कर्मचाऱयांसाठी पाच दिवसांचा आठवडा आणि 16 टक्के वेतनवाढ केंद्र सरकारने मंजूर केल्याने कर्मचाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुमारे 1 लाख 40 हजार कर्मचाऱयांना याचा लाभ होणार आहे.
आयुर्विमा कर्मचाऱयांनी चाळीस टक्के वेतनवाढीची मागणी सरकारकडे केली होती. मात्र 16 टक्के वेतनवाढीवर हा करार झाला असल्याचे ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशनचे जनरल सेव्रेटरी श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले.
ही नवीन वेतनवाढ 1 ऑगस्ट 2017 पासून लागू होणार आहे. तेव्हापासूनचा वेतनवाढीचा फरकही कर्मचाऱयांना मिळणार आहे असेही मिश्रा यांनी सांगितले.
पाच दिवसांचा आठवडा
वेतनवाढीबरोबरच एलआयसी कर्मचाऱयांसाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे कार्यालयीन कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणजे शनिवार, रविवार अशी दोन दिवस साप्ताहिक सुट्टी मिळणार आहे. पाच दिवसांचा आठवडा आणि 16 टक्के वेतनवाढ या दोन मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्याने कर्मचाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


























































