
कोरोनावरील उपचारांसाठी रेमडेसिवीर हे औषध प्रभावी ठरत असल्याने मोठय़ा प्रमाणात त्याची मागणी होत आहे. या औषधाचा तुटवडा व काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने रेमडेसिवीरचे दर नियंत्रणात आणत औषधाच्या किंमती 2000 रुपयांनी कमी केल्या आहेत. शिवाय एका यंत्रणेमार्फतच या औषधाचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.
देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक झपाटय़ाने वाढत आहे. रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता देखील भासत होती. अशात कोरोना रूग्णांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे रेमडेसिवीर उत्पादन वाढणार असून जवळपास 2 हजार रुपयांपर्यंत दर कमी होणार आहेत.
या किंमती कमी करण्यासाठी, रासायनिक खते मंत्रालय उत्पादक कंपन्यांशी मागील 2 दिवसांपासून बैठक करीत होते. अखेर रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादन घेणाऱया देशातील कैडिला हेल्थकेयर, डॉ रेड्डीज, सिपला, जुबिलेंट जेनरिक आदी 7 प्रमुख औषध कंपन्यानी इंजेक्शनच्या किंमती कमी करण्यास मान्यता दिली आहे.
औषध नाव आधीची किंमत नवी किंमत
रेमडेक 2800 रु 899 रु
रेमवीन 3950 रु 2450 रु
रेडीक्स 5400 रु 2700 रु
सीप्रमी 4000 रु 3000 रु
डेसरेम 4800 रु 3400 रु
जुबी-आर 4700 रु 3400 रु
कोवीफोर 5400 रु 3490 रु

























































