टेन्शन नको, उद्यापासून रेमडेसिवीर मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सध्या रेमडेसिवीरचा तुटवडा फार मोठय़ा प्रमाणात जाणवतो ही वस्तुस्थिती आहे. पण 21 तारखेनंतर रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत सुरू होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांच्या उपचारासाठी जास्तीत जास्त रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे ज्या कंपन्यांचा माल देशाबाहेर जाणार नाही त्या कंपन्यांचे उत्पादन महाराष्ट्रात विकावे यासाठी एफडीएचा प्रयत्न आहे. त्यातील 3-4 कंपन्यांनी प्रतिसाद दिला आणखी काही कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांत रेमडेसिवीरची समस्या दूर होईल, असे शिंगणे यांनी स्पष्ट केले.

सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेसे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयांत रेमडेसिवीर इंजेक्शन वापरण्याबाबतची सूचना पाळली जात नाही. खासगी रुग्णालयात सौम्य लक्षणे असली तरी रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जाते. रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही त्याची मागणी होताना दिसत आहे. रेमडेसिवीर बनविणाऱया कंपन्यांनी उत्पादन वाढविण्यास सुरुवात केली असून काही कंपन्यांनी मे महिन्यात पुरवठा करू, असे सांगितले आहे, असे शिंगणे यांनी सांगितले.
– राजेंद्र शिंगणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री