एमबीबीएसच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवडय़ात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवडय़ात होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी दिली. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता जूनमध्ये ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेऊन घेतली जाईल असे देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे एमबीबीएसच्या परीक्षा 19 एप्रिलपासून घेण्यात येणार होत्या. परंतु आता त्या जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी त्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल असे देशमुख यांनी सांगितले.