
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात हजारो प्राचीन नाणी आणि आभूषणांचे विशेष दालन आहे. थोडय़ाथोडक्या नव्हे तर जगभरातील दोन ते तीन हजार वर्षांपूर्वींच्या 37 हजार नाण्यांचा संग्रह वस्तुसंग्रहालयात बघता येतो. एखाद्या वस्तुसंग्रहालयात विशिष्ट गॅलरी कशी उभारली जाते, तिची कशी काळजी घ्यावी, यासंदर्भातील एक ऑनलाईन सत्र 28 एप्रिलला सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
ऑनलाईन सत्रात बुधवारी संग्रहालयातील प्राचीन नाणी आणि अलंकार या दोन गॅलरींविषयी वास्तुस्थापत्यतज्ञ नंदिनी संपत माहिती देणार आहेत. नंदिनी संपत यांनी या दोन्ही गॅलरींचा आराखडा तयार केलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात 2019 साली प्राचीन आभूषणांचे दालन सुरू झाले आहे. मनीषा नेने आणि उषा बालकृष्णन त्याच्या क्युरेटर आहेत. 2020 साली नाण्यांच्या दालनाची नव्याने उभारणी करण्यात आली. आकर्षक फर्निचर, रंगसंगती, रोषणाई यांचा विचार करून गॅलरी साकारण्यात आली आहे. ते उभरताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला, याची माहिती उद्या नंदिनी संपत देणार आहेत.
गॅलरीमध्ये एक हजार वर्षांपूर्वीचे हिंदुस्थानी परंपरेचे अलंकार आहेत. महाराष्ट्रातील पारंपरिक अलंकारांचाही त्यात समावेश आहे.
सत्र विनामूल्य असून https://zoom.us/webinar/register/WN_FLUQnw2uRb2rugdGPTUUPQ
या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
























































