चंद्रकांत पाटील फालतू बोलतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका;राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार किती झपाटय़ाने काम करतात, किती वेगाने काम करतात, कशा पद्धतीने काम करतात हे महाराष्ट्राला माहिती आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सगळंच खरं बोलतात अशातला भाग नाही. ते काहीतरी बोलायचे म्हणून बोलतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पालकमंत्री म्हणून पुण्यावरही पूर्ण लक्ष आहे. अनेकवेळा पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये येऊन बैठका घेऊन प्रश्न सोडवत असतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे जयंत पाटील म्हणाले.

कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पुण्यात येऊन उभे राहिले, त्यांना पुण्यातील जनतेने निवडून दिलेले आहे. त्यामुळे पुण्यासाठी मी काहीतरी करतोय हे सांगण्याचा जर ते प्रयत्न करत असतील आणि त्यासाठी अजित पवारांवर टीका करतात. त्यामुळे त्याकडे पुणेकरांनी लक्ष देण्याची आवश्यकता नाही.