
हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचे जनक चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या 151व्या जयंतीनिमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी फिल्म डिव्हिजनच्या वतीने दोन दिवसांचा माहितीपट आणि ऑनिमेशनपटांचा महोत्सव आयोजित केला आहे. हा महोत्सव ऑनलाईन होणार आहे.
30 एप्रिलला दादासाहेब फाळके यांची जयंती आहे. यानिमित्ताने 29 आणि 30 एप्रिलला फाळके यांच्यावरील पाच चरित्रपट दाखवण्यात येणार आहेत. त्यात ‘ड्रीम टेक्स विंग्ज’, ‘फाळके चिल्ड्रेन’, ‘द पी प्लांट लिगॅसी’, ‘ट्रेसिंग फाळके’ आणि ‘रंगभूमी’ या चित्रपटांचा समावेश आहे. फिल्म्स डिव्हिजन डॉट ओआरजी आणि प्रभागाच्या अधिकृत यू-टय़ूब चॅनलवर हे चित्रपट मोफत पाहता येतील.




























































