थोरात सहकारी साखर कारखाना ऑक्‍सिजन निर्मिती करणार, तातडीने स्कीड माऊंटेड ऑक्सिजन प्लांटची खरेदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 500 बेडचे अद्यावत कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड सेंटर करिता व इतर रुग्णालयांत करिता लागणार्‍या ऑक्सिजनसाठी कारखान्याच्या वतीने तातडीने तैवान येथून स्कीड माऊंटेड ऑक्सिजन प्लांटची खरेदी करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसात हा ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ओहोळ म्हणाले की, राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी कोरोना संकटात जनसामान्यांना सातत्याने मोठी मदत केली आहे. त्यांच्यावर राज्यात प्रशासनाची मोठी जबाबदारी असतानाही अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची काळजी घेताना कोरोना रुग्णांना औषधे, ऑक्सीजन याचबरोबर चांगल्या सुविधा देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. ही कोरोणा वाढ कमी करण्यासाठी तालुक्यात घरोघर तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील व जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी राज्य पातळीवरील वरिष्ठ स्तरावरून त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून ऑक्सिजन मिळवला आहे.

नगर रोडवरील विघ्नहर्ता लॉन्स येथे थोरात कारखान्याने ५०० बेडचे अद्यावत कोवीड केअर सेंटर सुरू केले असून या केअर सेंटर करिता व इतर रुग्णालयांकरीता लागणारा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी कारखान्याच्या व्यवस्थापनाने तैवान येथून स्किड माऊंटेड ऑक्सीजन प्लांट खरेदी करण्याचा दूरदृष्टीने निर्णय घेतला आहे. या

ऑक्‍सिजनच्या प्लांट वर 7 घनमीटर क्षमतेची दैनंदिन 85 ऑक्सिजन सिलिंडर भरले जाऊ शकणार आहे. यातून दररोज 1 टन ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. यामुळे कोवीड केअर सेंटर तसेच इतर रुग्णालयांकरता होणारा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होणार आहे. हा उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरणार आहे.