भांडणे सोडविल्याच्या रागातून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भांडणे सोडविल्याचा रागातून टोळक्याने तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खूनाचा प्रयत्न केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी सहा ते सात जणांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरहान पिरजादे (वय 19,रा. कोंढवा खुर्द) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. ही घटना कोंढव्यातील जयश्री सुपर शॉपी समोर शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहानने आरोपींची काही जणांसोबत सुरू असलेली भांडणे सोडविली होती. त्याचा राग आरोपींना असल्यामुळे त्यांनी शुक्रवारी रात्री फरहान मित्रांसोबत पुâटबॉल खेळण्यासाठी जात असताना अडविले. त्याच्यावर कोयता व पालघनने वार करून जखमी केले. फरहान याचे दोन मित्र मध्ये आले असता त्यांना बेसबॉल स्टीकने जबर मारहाण केली. याप्रकरणी कोंढवा पोलिस तपास करत आहेत.