वय 100 वर्षे, वजन 108 किलो! जीवशास्त्रज्ञांना मिळाला दुर्मिळ मासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका माशाचे वय फार तर किती असेल, 20 किंवा 30 वर्षे किंवा त्याहून थोडे जास्त. अमेरिकेत मात्र चक्क 100 वर्षे वयाचा मासा सापडला आहे. तिथल्या वन विभागात काम करणाऱया कर्मचाऱयाला हा 108 किलो वजनाचा मासा दिसला. माशाचा फोटो काढून त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय. एवढा मोठय़ा वयाचा मासा बघून नेटीजन्स हैराण झाले आहेत.

हा मासा डेट्राईट नदीत सापडला असून त्याची लांबी सहा फूट 10 इंच आहे. त्याला ग्रोसे इले या भागात संशोधन सुरू असताना तीन जीवशास्त्रज्ञांनी पकडले होते. जसजसा हा मासा जवळ आला, तसा तो मोठा झाला, अशी माहिती जेसन फिश्चर यांनी दिली. लेक स्टर्जन नावाची ही दुर्मीळ प्रजाती आहे. या प्रजातीचे मासे जाळ्यात अडकले की त्यांना लगेच पाण्यात सोडले जाते. कारण ही प्रजाती नष्ट होण्याची भीती आहे.