
कोरेगाव पार्कमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यावसायाचा गुन्हे शाखेच्या समाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. त्यानंतर 9 मुलींची सुटका करण्यात आली आहे.
कोरेगाव पार्क परिसरातील योगनिद्रा व फेमिना स्पा येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी साध्या वेशात जाऊन त्याठिकाणी छापा टाकला. त्यानंतर 9 मुलींची सुटका करण्यात आली आहे. ही कामगिरी सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे.



























































