इंजिनीयरिंगचे वर्ग 15 सप्टेंबरपासून चालू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंजिनीयरिंगच्या पहिल्या वर्षाचे वर्ग यंदा 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येतील असे अखिल भारतीय  तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) सांगितले आहे. एआयसीटीईने 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकात तसे नमूद केले आहे.

यावर्षी इंजिनीयरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे समुपदेशनाचा पहिली फेरी 31ऑगस्टपर्यंत, तर दुसरी फेरी 9  सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थांनी त्यांचे वर्ग 1 जुलैपर्यंत सुरू करावेत, असेही एआयसीटीईने म्हटले आहे.

तंत्रशिक्षण संस्थांमधील दूरस्थ आणि मु्क्त अध्ययन अभ्यासक्रम तसेच पूर्णवेळ ऑनलाईन अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 30 जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावी, असेही निर्देश एआयसीटीईने दिले आहेत.  कोरोना परिस्थितीनुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाइन्सप्रमाणे या वेळापत्रकात बदल होऊ शकतो, असेही एआयसीटीईने स्पष्ट केले आहे.