फेसबुकवरील अनोळखी फ्रेंडशिप ठरेतय घातक, उच्चशिक्षितांना सायबर चोरट्यांचा कोट्यावधींचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नवनाथ शिंदे

नागरिकांनो सावधान तुम्ही जर फेसबुकवरील अनोळखी लोकांसोबत चॅट करीत असाल, तर तुमची आर्थिंक फसवणूक होउ शकते. सोशल मीडियावरील अनोळखी मैत्री उच्चशिक्षितांचा खिसा रिकामा करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी ‘फ्रेंडशीप’ केल्यानंतर सायबर चोरट्यांकडून मोहजाळ्यात अडकवून अनेकांना गंडा घातला जात आहे. त्यामध्ये आयटी इंजिनिअर, विद्यार्थी, डॉक्टर, निवृत्त शिक्षण, निवृत्त शासकिय अधिकारी, खासगी कंपनीतून वरिष्ठ पदावून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. मागील चार महिन्यात सायबर चोरट्यांनी पुण्यातील उच्चशिक्षित 90 जणांना कोट्यावधी रूपयांचा गंडा घातला आहे.

मोबाईलचा वाढत्या वापरामुळे तरुणापासून ते ज्येष्ठांपर्यंत बहुतांश जणांकडून फेसबुक, इन्साग्रामवर मैत्री करण्यास प्राधान्य दिले जाते. प्रत्यक्षात मात्र, सोशल मडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करणे उच्चशिक्षितांना महागात पडल्याचे दिसून आले आहे. फेसबुकवर बनावट नावाने प्रोफाईल तयार करून तरुणाचा फोटो अपलोड केला जातो. त्यानंतर सायबर चोरट्यांकडून फ्रेड रिक्वेस्ट पाठवून जाळे टाकले जाते. फ्रेड रिक्वेस्ट स्वीकारलेल्या व्यक्तीशी चॅटिंग सुरू करून ओळख वाढविण्यास सुरूवात केली जाते. त्यानंतर सायबर चोरट्यांंकडून संबंधिताला आपण परदेशात मोठ्या पदावर असल्याचे सांगून भुरळ घातली जाते.

सायबर चोरट्यांकडून जाळ्यास फसणाऱ्या व्यक्तीसोबत ओळख वाढवून व्हॉटसअप क्रमांक घेतला जातो. त्यानंतर त्याच्यावर परत चॅटींग करून विश्वास संपादन केला जातो. चांगली मैत्री झाल्यानंतर परदेशातून महागडे गिफ्ट पाठविले असल्याचे सांगत फसवणूकीचा डाव टाकला जातो. विमानतळावरून गिफ्ट सोडवून घेण्यास सांगत पैसे उकळण्यास सुरूवात केली जाते. पैशाच्या अथवा गिफ्टच्या आमिषाने नागरिक पैसे जमा करतात. मात्र, पैसे भरल्यानंतरही गिफ्ट न मिळाल्यामुळे फसवणूक झाल्याचे उशीरा लक्षात येते. तोपर्यंत सायबर चोरटे पाठविलेले पैसे काढून घेतात. त्यामुळे नागरिकांची फसवणूक होते. दिवसेदिवस ऑनलाईन मीडियाद्वारे सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक केल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत चालली आहे. विशेषतः उच्चशिक्षित तरूणांमध्येही अनोखळी मैत्री करण्यासाची हौस
चौकट- पुण्यातील नागरिकांची झालेली फसवणूक

जेष्ठ महिलेला आयफोनची हाव पडली 4 कोटींना

खासगी कंपनीतून निवृत्त झालेल्या एका 60 वर्षीय महिलेची फेसबुकवरून एकासोबत ओळख झाली होती. संबंधिताने महिलेला ब्रिटनमध्ये असल्याचे सांगत महागडा आयफोन भेट पाठवितो म्हणून सांगितले. त्याच्यावर भरोसा ठेउन महिलेने वेळोवेळी मोबाईलसाठी पैसे पाठविले. त्यानुसार सायबर चोरट्याने महिलेकडून तब्बल 4 कोटी रूपये उकळल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. त्यामुळे

सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर महिलेला 5 लाखांचा गंडा

फेसबुकवरून मैत्री करून सायबर चोरट्याने शहरातील कॅम्प परिसरात राहणाऱ्या सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर महिलेला पाच लाख रूपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सायबर चोरट्याने अधिकारी महिलेला फ्रेड रिक्वेस्ट पाठवून मैत्री करून केली. त्यानंतर महागडे गिफ्ट पाठविल्याचे सांगून पैसे उकळले आहेत. अधिकारी महिलेने सायबर चोरट्याला पैसे िपरत करण्यासाठी विनंती केली असता, त्याने मोहजाळ्यात अडकवून आणखी एक लाख रूपये उकळले आहेत.

डॉक्टर तरूणीला 40 हजारांचा गंडा

फेसबुकवर एका अनोळखी व्यक्ती सोबत मैत्री करणे कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या या डॉक्टर तरुणीला महागात पडले आहे. ओळखीतून त्यांनी एकमेकांचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर सायबर चोरट्याने डॉक्टर तरुणीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन 40 हजार रूपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय फेसबुकवर ओळख झाल्यानंतर बारामतीतील तरुणीला पुण्यात बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकी आली आहे.

फेसबुक वापरताना अशी घ्या काळजी

  • कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेड रिक्वेस्ट स्वीकारू नका फोटो, व्हिडीओ, सर्वांना दिसतील अशा तऱ्हेने ठेउ नका.
  • सोशल मीडियावरील ओळखीतून आर्थिक व्यवहार करू नका.
  • आयफोनसह विविध आमिषांना बळी पडू नका.
  • कोणालाही वैयक्तिक माहिती देणे टाळा.
  • फसवणूक झाल्यास तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार करा.
  • बँकखात्याची गोपनीय माहिती कोणालाही देउ नका.
  • कोणतीही बँक पासवर्डची विचारणा करीत नाही.