वेळेत ऑक्सिजन मिळाल्याने वाचले 65 कोरोना रुग्णांचे प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन कमी होत होता. 75 ऑक्सिजन बेड्सच्या रुग्णालयात 65 कोरोना रुग्ण ऑक्सिजन लावलेले होते. टँकमधील ऑक्सिजन कमी होत होता. सर्वजण चिंतेत असतानाच रात्री 12 वाजता ऑक्सिजनचा टँकर आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तीन टन ऑक्सिजन वेळेत आल्याने या सर्व रुग्णांचे प्राण वाचले आहेत.

शिराळा येथील ऑक्सिजन टँक 6 के.एल. क्षमतेचा आहे. येथील टँकच्या फ्लो मीटरवरून शिल्लक वायू कळतो. हे पाहून ऑक्सिजनची मागणी चार दिवस आधी नोंदविली जाते. यासाठी पाठपुरावा केला जातो. गेल्या शनिवारी अर्धा टन ऑक्सिजन शिल्लक होता. ही पातळी कमी होत होती. त्यामुळे चिंतेचे वातावरण होते. मात्र, रात्री 12 वाजता ऑक्सिजनपुरवठा झाला.

आमदार मानसिंगराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. मनोज महिंद, डॉ. योगिता माने, अधीक्षक मोमिन आदी अधिकाऱयांमधील समन्वयामुळे ही यंत्रणा सुरळीत काम करीत आहे.