
राज्यातील जवळपास तीन कोटी वीज ग्राहकांना आता पेटीएमच्या माध्यमातून वीज बिल भरता येणार आहे. त्यासाठी वीज वितरण कंपन्या आणि पेटीएममध्ये करार झाला आहे. त्यामुळे पेटीएमधारक वीजग्राहकांना कोणत्याही वीज बिल भरणा केंद्रावर न जाता घरी बसूनच आपले बिल भरता येणार आहे. तसेच ग्राहकांना एक हजार रुपयांपर्यंत कॅशबॅकही मिळू शकणार आहे. कोरोना महामारीमुळे राज्यभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे आपल्या नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावर मर्यादा आलेल्या आहे. त्याची दखल घेत वीज ग्राहकांना 24 तास कधीही घरात बसून वीज बिल भरता यावे म्हणून महावितरण, टाटा पॉवर, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि बेस्टसोबत करार केला आहे.



























































