सराईताच्या अंत्यविधीला दुचाकी रॅली काढणे भोवले, तब्बल 100 जण ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत  सराईताच्या अंत्यविधीला  दुचाकी  रॅली काढणे 100 जणांना  भोवले आहे.  संबंधितांविरूद्ध कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून  याप्रकरणी 50 पेक्षा जास्त दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. शनिवारी दुपारी  150 ते 200 जणांनी सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत दुचाकी रॅली काढली होती. माधव हनुमंत वाघाटे या सराईताच्या अंत्यविधीला दुचाकी रॅली काढण्यात आली होती.

>

वादातून टोळक्याने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सराईत माधव वाघाटे याचा खून केला होता. त्यानंतर  शनिवारी  दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याच्यावर कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यामुळे 100 ते 125 जणांनी दुचाकीवरून रॅली काढली. टोळक्याने बालाजीनगर ते धनकवडी आणि कात्रज स्मशानभूमीपर्यंत विना परवानगी रॅली काढून शांततेचा भंग केला कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर मिरवणूक आणि रॅली काढण्यास बंदी असतानाही टोळक्याने रॅली काढल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पुणे पोलिसांच्या 15 पथकाकडून आरोपीची धरपकड सुरू करण्यात आली होती. त्यानुसार

अंत्ययात्रेत दुचाकीवर रॅलीत सहभागी असणार्‍या  100 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेउन कारवाई करण्यात आली आहे.कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत रेकॉर्डवरवरील गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेत दुचाकी रॅली काढण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आतापर्यंत 100 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतले आहे. त्याशिवाय संबंधितांच्या दुचाकीही जप्त करण्यात  आल्या आहेत. अंत्ययात्रेत दुचाकी रॅली काढणार्‍यांची शोधमोहिम सुरू आहे. – सागर पाटील, पोलीस उपायुक्त झोन दोन