
गेल्या अनेक महिन्यांपासून सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड पूल (एससीएलआर) ते कुर्ला, नेहरू नगरातील मदर डेअरी मार्गावर मेट्रोचे काम सुरू झालेले नसतानाही त्यासाठी बॅरिकेड्स लावून रस्त्यावर वाहतूककाsंडी निर्माण झाली होती. यासंदभार्त शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला असता येथील बॅरिकेड्स शक्य तितके आत सरकवून मदर डेअरी मार्ग अधिक रुंद करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळय़ाच्या तोंडावर या मार्गावरील वाहतूककाsंडी दूर होण्यास मदत होणार आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून एससीएलआर पूल तसेच नेहरू नगरातील मदर डेअरी मार्गावर मेट्रोचे काम बंद आहे. त्यामुळे बॅरिकेड्समुळे नागरिकांना वाहतूककाsंडीचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात आमदार मंगेश कुडाळकर यांनी एमएमआरडीएला यासंदर्भात तक्रार करीत वाहतूककाsंडी हटविण्यास सांगितले. त्यास एमएमआरडीएने उत्तर देताना म्हटले की, मेट्रो मार्ग-2 ‘ब’ ( डी.एन.नगर-मंडाळे मधील पॅकेज क्र. सीए 06 एमटीएनएल, बीकेसी-डाममंड गार्डन, चेंबूर)च्या स्थापत्य बांधकामासाठी कंत्राटदार मे.एम.बी.झेड-आर.सी.सी. (जेव्ही)या कंत्राटदारास 12 एप्रिल 2018 रोजी काम दिले होते. या पॅकेजची मार्गिका मातृदुग्धशाळा मार्गाच्या दुभाजकावरून धावते. यासाठी कंत्राटदाराने बॅरिकेड्स बोर्ड लावले असून या ठिकाणी मेट्रोच्या स्तंभाच्या पायाचे अर्धे बांधकाम केलेले आहे; परंतु कंत्राटदाराच्या कामाच्या संथगतीमुळे हे पंत्राट 31 जानेवारी 2020 रोजी रद्द केले असून नविन निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
नव्या कंत्राटदाराची नेमणूक करणार
मेट्रो-2 ‘ब’ च्या पायाभरणीचे काम पूर्ण न झाल्याने संपूर्ण बॅरिकेड्स सध्या तरी हटविता येणार नसले तरी आमदार कुडाळकर यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे मातृदुग्धशाळा रस्त्यावरील बॅरिकेडस् बोर्ड शक्य तितके आत सरकविण्यात आल्याचे एमएमआरडीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मातृदुग्धशाळा रस्त्यावर वाहतुकीसाठी जास्त मार्ग मोकळा करण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पॅकेज क्र.सीए 06 उर्वरित काम पूर्ण करण्याकरिता नव्याने निविदा काढणे सुरू असून हे काम लवकर पूर्ण करून येथील सर्व बॅरिकेड्स हटविले जातील असे एमएमआरडीए प्रशासनाने म्हटले आहे.

























































