संगमनेर तालुक्यात आढळले तब्बल 617 कोरोनाबाधित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत नगर जिल्ह्यात संगमनेर तालुका पहिल्या क्रमांकावर असतानाच आज संगमनेरमध्ये कोरोना रुग्णांनी उच्चांक गाठला आहे. एका दिवसात तब्बल 617 रुग्ण आढळून आले आहेत, तर विनाकारण फिरणाऱयांच्या रॅपिड ऑण्टिजेन टेस्टमध्ये ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाच्या दुसऱया लाटेत नगर जिह्याची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असताना संगमनेर तालुका रुग्णवाढीत आघाडीवर होता. दोन दिवस ही संख्या कमी झालेली असतानाच आज मात्र रुग्णांची संख्या उच्चांकी झाली असून, 617 आज रुग्ण आढळून आले आहेत. विनाकारण फिरणाऱयांच्या रॅपिड ऑण्टिजेन टेस्ट केल्यानंतर तळेगाव, घारगाव, आश्वी या परिसरासह ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढलेली दिसते. शहरात विनाकारण फिरणाऱयांची रॅपिड ऑण्टिजेन टेस्ट केलेल्यांमध्ये कमी प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत.

तहसीलदारांकडून माहिती देण्यास टाळाटाळ

n विनाकारण भटकंती करणाऱयांची जागेवरच रॅपिड ऑण्टिजेन टेस्ट करून पॉझिटिव्ह असलेल्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून मिळाल्यानंतर पहिल्या दिवशी संगमनेर शहरात करणाऱयात आलेल्या चाचण्यांची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शहरातील आणि ग्रामीण भागातील मोकाट फिरणाऱयांची व त्यात सापडलेल्या रुग्णांची आकडेवारी देण्यात तहसीलदार यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे.