
आयसीएमआरने घरीच कोरोना चाचणी करण्यासाठी एका रॅपिड अँटीजन टेस्ट किटला मंजुरी दिली आहे. या किटद्वारे लोकांना नाकातून सॅम्पल घेऊन चाचणी करता येईल.
ही चाचणी मॅन्युअल पद्धतीने होईल. यासाठी गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअरवरून ऍप डाऊनलोड करावा लागेल. मोबाईल ऍपवरून रिपोर्ट मिळेल.त्यासाठी टेस्ट स्ट्रीपचा चाचणीनंतरचा फोटो व्हॉट्स- ऍपवरून आयसीएमआरच्या टेस्टिंग पोर्टलवर पाठवावा लागणार आहे. होम आयसोलेशन टेस्टिंग किटसाठी पुण्यातील कंपनी माय लॅब डिस्कवरी सोल्यूशन लिमिटेडला अधिकृत केले आहे. या टेस्टिंग किटचे नाव कॉविसेल्फ आहे.
अशी करता येणार चाचणी
- या किटमधून नाकातील स्वॅबचे सॅम्पल घ्यावे लागेल.
- होम टेस्टिंग करणाऱयाला टेस्ट स्ट्रिपचा फोटो घ्यावा लागेल.
- हा फोटो आयसीएमआरच्या टेस्टिंग पोर्टलवर स्टोअर होईल.
- यानंतर ती व्यक्ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असल्याची खात्री पटेल.
























































