नरेंद्र मोदी फक्त गुजरातचेच पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान देशाचा असतो. मात्र, नरेंद्र मोदी केवळ गुजरातचेच पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करून केली आहे.

तौकते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गोवा, गुजरातसह पाच राज्यांना फटका बसला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा हवाई दौरा करून मदत जाहीर केली. पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीकडे फिरकलेदेखील नाहीत. त्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी केवळ गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागत आहेत, असा प्रश्न उपस्थित करून मोदी यांचे अन्य राज्य व तेथील लोकांकडे दुर्लक्ष होत आहे, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले आहे.