अॅलोपॅथी वादावर बाबा रामदेव यांनी मागितली माफी, आरोग्य मंत्र्यांनी पाठवले होते पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अॅलोपॅथी वादावर योग गुरू बाबा रामदेव यांनी माफी मागितली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी रामदेव बाबा यांना पत्र पाठवले होते. तसेच आपण अॅलोपॅथी किंवा आधुनिक विज्ञानाच्या विरोधात नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. ऍलोपॅथीला एक मूर्ख आणि बिनकामाचे विज्ञान आहे असे बाबा रामदेव यांनी म्हटले होते. तसेच रेमडेसिवीर, फेविफ्लू आणि डीसीजीआयने मंजुरी दिलेल्या दुसऱ्य़ा  औषधांमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या विधानाने ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया (डीसीजीआय) आणि आरोग्य मंत्र्यांच्याच प्रतिष्ठेला आव्हान दिले होते. त्याचबरोबर लाखो लोकांचे जीव धोक्यात टाकले आहे. सरकारने रामदेवबाबांविरुद्ध कारवाई न केल्यास आपण कायदेशीर कारवाईचा मार्ग पत्करणार असल्याचा इशाराही आयएमएने दिला होता.
नंतर आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना पत्र लिहिले होते. यावर बाबा रामदेव म्हणाले की “माध्यमांमध्ये जे माझे वक्तव्य दाखवले होते ते मी व्हॉट्सऍपवरील एक मेसेज वाचत. होतो माझ्या या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. ” तसेच आपण कुठल्या विज्ञानाच्या किंवा अॅलोपॅथीच्या विरोधात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.