
अमेरिकेने आपल्या नागरिकांना जपानला जाण्यास प्रतिबंध घातलेला नाही. मात्र, जपानला जाणाऱया नागरिकांच्या विमा दरामध्ये बदल नक्कीच होणार आहे. त्यामुळे अमेरिकेचे खेळाडू देखील टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेण्याबाबत गंभीरपणे विचार करत असल्याचे वृत्त आहे.
कोरोनाच्या संकटातही जपानने टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी कंबर कसली आहे. क्रीडाविश्वातील या सर्वेच्च स्पर्धेला जेमतेम दोन महिन्यांचा कालावधी उरलाय. आपल्या नागरिकांनी जपान दौरा स्वतःच्या जबाबदारीवर करावा, असे अमेरिकेतील आरोग्य विभाग आणि गृह विभागाने सांगितले आहे. त्यातच जपानच्या प्रवासासाठीच्या विमा दरातही ते बदल करणार आहेत. याचाच दुसरा अर्थ म्हणजे तुम्ही जपानला जाऊ नका असाही होतो. त्यामुळे ऑलिम्पियन खेळाडूंवरही याचा परिणाम झाला असून, ते टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हायचे की नाही याबाबत आता विचार करायला लागले आहेत. जपानचा दैरा शक्य तो टाळण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही अमेरिकेने आपल्या नागरिकांना केले आहे. मात्र, अमेरिकन ऑलिम्पिक समिती आणि पॅरालिम्पिक समितीने आमचे खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतील, असे स्पष्ट केले
आहे.






























































