
चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वाघाच्या हल्ल्यात वाढ होत आहे आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात 20 नागरिकांचा बळी गेला आहे. आज सकाळच्या सुमारास जंगलात तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या मजुराचा वाघाच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. दक्षिण ब्रह्मपुरी वन क्षेत्र आवळगाव बिट मधील ही घटना असून तो मजूर ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी गावातील रहिवाशी आहे.
भाऊराव जांभुळे असं मृतकाचं नाव आहे. तो तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेला जंगलात गेला होता. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले. ब्रह्मपुरी क्षेत्रात वाघाच्या दहशतीत ग्रामीण जगत असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.































































