कुणाच्या बापामध्ये हिंम्मत नाही मला अटक करण्याची -बाबा रामदेव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुणाच्या बापामध्ये मला अटक करण्याची हिंम्मत नाही असे विधान योग गुरू बाबा रामदेव यांनी केले आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावा व्हायरल होत आहे.

ऍलोपॅथी हे मुर्ख विज्ञान आहे असे वादग्रस्त विधान बाबा रामदेव यांनी केले होते. त्यावर देशातल्या डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर बाबा रामदेव यांनी खेद व्यक्त करत आपले वक्तव्य मागे घेतले होते. आता इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांना एक हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवून त्यांना माफी मागण्यास सांगितले आहे.

असे असताना बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कुणाच्या बापामध्ये हिंम्मत नाही असे बाबा रामदेव या व्हिडीओ मध्ये म्हणत आहेत. ट्विटवर काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांना अटक करा अशा आशयाचे ट्रेंड सुरू होते, त्यावर बाबा रामदेव म्हणत आहेत की, कुणाच्या बापामध्ये हिंम्मत नाही मला अट करण्याची. अनेक लोकांनी quit ramadev, thug ramdev असे ट्रेंड चालवले, या ट्रेंडमध्ये पण आपण टॉपवर होतो असे म्हणत बाबा रामदेव यांनी टाळ्या वाजवल्या. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

योगगुरू बाबा रामदेव यांना इंडियन मेडिकल असोसिएशनने एक हजार कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. बाबा रामदेव यांनी व्हिडीओ जारी करून आयएमएची माफी मागावी आणि 15 दिवसांच्या आत लिखित माफी मागावी अशी मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. असे न केल्यास एक हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू असे आयएमएने म्हटले आहे. त्यात बाबा रामदेव यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.