
इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वाविषयी एक महत्त्वाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने शनिवारी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
आयपीएलच्या 14व्या मोसमाची सुरुवात झाल्यानंतर काहीच दिवसात देशात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यानंतर 4 मेपासून आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या मोसमाचे एकूण 31 सामने खेळवणे अद्याप बाकी आहेत. हे उर्वरित सामने दुबईमध्ये होणार आहेत. हे सामने सप्टेंबरच्या 18 ते 20 दरम्यान सुरू केले जातील. ते पुढे ऑक्टोबर महिन्यापर्यंत मोसम संपवण्यात येईल.
या सामन्यांमध्ये अंतिम सामन्यासह 4 प्ले ऑफ मॅचेस, 10 डबल हेडर मॅचेस आणि 7 सिंगल हेडर मॅचेसचा समावेश असणार आहे.


























































