
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत बालकलाकार अदिती जलतारे छोटय़ा अहिल्याबाईंची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे मला खूप काही शिवायला मिळाले. आयुष्यभर हे धडे मी विसरणार नाही, असे अदितीने सांगितले.
31 मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची 296 वी जयंती आहे. नुकतीच मालिकेच्या टीमने सेटवर जयंती साजरी करत अहिल्याबाईंना अभिवादन केले. अदिती म्हणाली, ’ज्या काळात सामाजिक रूढी आणि पुरुष प्रधानतेचा पगडा समाजावर होता. त्याकाळात अहिल्याबाईंनी आपल्या उदाहरणाने हे सिद्ध करून दिले की, मनुष्य त्याच्या कर्तृत्काने मोठा होतो. जन्माने तो मुलगा किंवा मुलगी आहे, म्हणून नाही. आयुष्यात आलेल्या आव्हानांना तोंड देत निर्धाराने त्या मार्गक्रमण करत राहिल्या. आपण न थकता, न खचता काम करत राहिलो, तर आज ना उद्या आपल्याला यश मिळतेच. ही व्यक्तिरेखा साकारताना आणि समजून घेताना मी हा एक मोठा धडा शिकले आहे.’

























































