20 खासगी प्रयोगशाळांना कोल्हापूर झेडपीच्या नोटीसा, कोरोना रुग्णचाचणी अहवालात तफावात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रुग्णांच्या चाचण्यांचा अहवाल एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्षाला वेळेत आणि विहीत नमुन्यात सादर न केल्याने जिल्ह्याच्या कोविड निर्देशांकात तफावत आली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील तब्बल 20 खासगी प्रयोगशाळांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी नोटिसा बजाविल्या आहेत.

25 एप्रिल ते 12 मे या कालावधीत आयसीएआर पोर्टलवरील कोरोना आरटीपीसीआर चाचण्यांचे 1877 आणि रॅपिड अँटिजेन टेस्टच्या 322 रुग्णांच्या नोंदणी अहवालाच्या संदर्भात कोल्हापूर जिल्हा व राज्यातील इतर 20 लॅबनी कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आले आहे. यामध्ये अँटीजेन टेस्टअंतर्गत अनुष्का डायग्नोस्टिक सेंटर (शिरोळ), केअर मल्टिस्पेशालिटी (हातकणंगले), निदान पॅथॉलॉजी (इचलकरंजी), जयसिंगपूरच्या अनुक्रमे पायोस हॉस्पिटल, श्री साई लॅब, कोल्हापूरची शिवतेज लॅब, पार्थ लॅब, देसाई पॅथॉलॉजी, सृष्टी क्लिनिकल लॅबोरेटरी, मृण्मयी लॅब, हेल्थ ह्यू या 11 प्रयोगशाळांनी, तर ‘आरटीपीसीआर’अंतर्गत कृष्णा डायग्नोस्टिक (पुणे), डॉ. लाल पॅथॉलॉजी (विमान नगर, पुणे), मेट्रोपॉलिस हेल्थ केअर (मुंबई), प्रिव्हेंटीन लाइफ केअर (नवी मुंबई), थायरोकेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि. (नवी मुंबई), इन्फेक्शन लॅबोरेटरीज (ठाणे), यूडीसी सॅटेलाइट लॅबोरेटरी (नवी मुंबई), सबअर्बन डायग्नोस्टिक, पुणे आणि अपोलो हेल्थ लाइफस्टाइल, सदाशिव पेठ या लॅबचा समावेश आहे. या लॅबवर कारवाईसाठीचा अहवाल जिल्हाधिकाऱयांकडे सादर करण्यात आला आहे.