असं काय झालं म्हणून विद्या बालन जंगलात फिरतेय? पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोड चेहऱ्याने आणि सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. गेल्या वर्षी विद्या बालन तिच्या शकुंतला देवी या चित्रपटामुळे चर्चेत होती. यंदाही तशीच चर्चेत आली आहे.

निमित्त आहे, ते तिच्या आगामी चित्रपटाचं. विद्या बालन अभिनित शेरनी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्यात ती जंगलात भटकताना दिसत आहे.

विद्या या चित्रपटात एका वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरमध्येही ती दोन पोलिसांसह जंगलात फिरताना दिसत आहे. या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर एक संवाद ऐकू येतो. जंगल कितीही दाट असलं तरी वाघीण आपली वाट हुडकून काढतेच, अशा अर्थाचा हा संवाद आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित मसूरकर या दिग्दर्शकाने केलं आहे. हा चित्रपट काही काळाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 2 जून रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होईल. चित्रपटात विद्यासोबत शरद सक्सेना, मुकुल चढ्ढा, विजय राज, इला अरुण, बृजेंद्र काला आणि नीरज काबी असे कलाकार झळकणार आहेत.

कहानी, द डर्टी पिक्चर असे चित्रपट एकहाती कहानी, द डर्टी पिक्चर असे चित्रपट एकहाती तोलून त्यात समर्थपणे भूमिका साकारकहानी, द डर्टी पिक्चर असे चित्रपट एकहाती तोलून त्यात समर्थपणे भूमिका साकारतोलून त्यात समर्थपणे भूमिका साकारणारी विद्या या चित्रपटात काय कमाल दाखवते, ते उत्सुकतेचं असणार आहे.

पाहा व्हिडीओ-