एकसारखे पासवर्ड ठेवू नका! पोलिसांनी मीम्समधून केली जनजागृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलीस नेहमीच ‘क्रिएटिव्ह’पद्धतीने सोशल मीडियावर जागृती करताना दिसतात. त्यांची प्रत्येक पोस्ट हटके असते. आताही तसेच झाले आहे. अलीकडची त्यांची पोस्ट नेटिजन्सचे लक्ष वेधून घेत आहे. ऑनलाईन सिक्युरिटी संदर्भातील खूप महत्त्काचा संदेश मुंबई पोलिसांनी खास मीम्सच्या माध्यमातून दिला आहे.

मुंबई पोलिसांनी ‘मनी हाइस्ट’ या लोकप्रिय वेबसिरीजचा संदर्भ घेतला आहे. पोस्टमध्ये अभिनेता अल्कारो मोर्टे, करुण धकन आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचे फोटो दिसत आहेत. तिघांचे ‘लूक’ जवळपास सारखेच काटत आहेत. ‘वेगवेगळ्या ऑनलाईन खात्यांचे पासकर्ड कसे ठेवू नयेत याचे हे उदाहरण’ अशी कॅप्शन या फोटोला दिली आहे. म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या प्रत्येक ऑनलाईन अकाऊंटचा पासकर्ड पूर्णतŠ भिन्न ठेकला पाहिजे, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

अनेक महत्त्काचे विषय खूप मजेशीर पद्धतीने समजवून सांगण्याच्या पोलिसांच्या या शैलीचे खूप कौतुक होत आहे. सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या पोस्टना भरपूर लाइक्स आणि कमेंट मिळत आहेत.